Type Here to Get Search Results !

दुगारवाडी धबधब्यावर दुर्दैवी घटना; २० वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

दुगारवाडी धबधब्यावर दुर्दैवी घटना; २० वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

नाशिक प्रतिनिधी :-

नाशिकजवळील प्रसिद्ध दुगारवाडी धबधब्यावर पर्यटनासाठी गेलेल्या जेलरोड परिसरातील अभिजित नवनाथ पवार (वय २०) या युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुवारी अभिजित हा आपल्या १० मित्र-मैत्रिणींसोबत धबधब्यावर फिरण्यासाठी गेला होता. यावेळी तो पाण्यात उतरला असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला.


घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत युवकाला पाण्याबाहेर काढून सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

या दुर्दैवी घटनेमुळे त्याच्या कुटुंबीयांसह मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून, पावसाळ्यात धबधबे व इतर पर्यटनस्थळी भेट देताना पर्यटकांनी पाण्यात उतरणे टाळावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Post a Comment

0 Comments