Type Here to Get Search Results !

भुजबळ फार्म परिसरात विचित्र अपघातांची मालिका; तीन वाहनांचे मोठे नुकसान

 भुजबळ फार्म परिसरात विचित्र अपघातांची मालिका; तीन वाहनांचे मोठे नुकसान

पंचनामा न्यूज नाशिक (प्रतिनिधी) :-ता:, २५ जुलै 

नाशिकच्या भुजबळ फार्म परिसरात सलग घडलेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तीन चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या अपघातांमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नसल्याने मोठी दुर्घटना टळली.



मिळालेल्या माहितीनुसार, एमएच 16 सीओ 2101 क्रमांकाची बलेनो कार रस्त्याच्या कडेला उभी असताना मागून भरधाव येणाऱ्या ट्रकने तिला जोरदार धडक दिली. या अपघातानंतर घटनास्थळी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. त्याचवेळी एमपी 35 ZE 7041 क्रमांकाची एर्टिगा कार अपघातस्थळी थांबलेली असताना मागून आलेल्या डीजे 06 PH 7345 क्रमांकाच्या टाटा चारचाकी वाहनाने एर्टिगाला जोरदार धडक दिली. त्यामुळे एर्टिगासह संबंधित वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.


सलग घडलेल्या या विचित्र अपघातांमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अपघाताची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली. या अपघातांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, अपघाताचे नेमके कारण काय याचा पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments