Type Here to Get Search Results !

कर्मवीरांच्या विचारांचा जागर; वावरे महाविद्यालयात ‘समाज दिन’ दिमाखात

 कर्मवीरांच्या विचारांचा जागर; वावरे महाविद्यालयात ‘समाज दिन’ दिमाखात


नाशिक प्रतिनिधी :- नितीन चव्हाण :, ता १९ ऑगस्ट 


मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कर्मवीर शांताराम बापू कोंडाजी वावरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात संस्थेचे संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमित्त ‘समाज दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात शैक्षणिक, क्रीडा, कला, एनसीसी व संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थी, खेळाडू तसेच प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.



कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र संस्थेचे संचालक ॲड. लक्ष्मण लांडगे होते. ज्येष्ठ साहित्यिक व लेखक डॉ. दिलीप धोंडगे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. यावेळी महाविद्यालय विकास समिती, शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती.


प्राचार्य डॉ. सुरेश जाधव यांनी प्रास्ताविकातून मविप्र संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीदवाक्य घेऊन संस्थेने ग्रामीण व बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली केल्याचे त्यांनी सांगितले.


डॉ. दिलीप धोंडगे यांनी आपल्या व्याख्यानातून मविप्रच्या निर्मितीचा ऐतिहासिक पट उलगडला. कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या बहुआयामी कार्याचा आढावा घेताना ते केवळ वतनदार नव्हते, तर प्रयोगशील शेतकरी, शिक्षणसुधारक, वसतिगृह व्यवस्थापक, कवी, लेखक आणि समाजसुधारक होते, असे त्यांनी नमूद केले. तसेच मविप्रच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या विविध कर्मवीरांच्या कार्याला त्यांनी उजाळा दिला.


अध्यक्षीय मनोगतात ॲड. लक्ष्मण लांडगे यांनी कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीचे आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाचे स्मरण केले. शांताराम बापू वावरे यांच्या त्यागाची आठवण करून देत त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन त्यांनी केले.


आशियाई पदकविजेत्यांचा विशेष गौरव


कार्यक्रमातील पुरस्कार वितरण सोहळा विशेष आकर्षण ठरला. जपान येथे झालेल्या आशियाई ड्रॅगन बोट स्पर्धेत भारतीय संघाला रौप्यपदक मिळवून देणारे अभिषेक नवले आणि दिव्यांग थोरात यांचा महाविद्यालयाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.


२०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. हेमंत कौतिक काळे यांना उत्कृष्ट क्रीडा संचालक पुरस्कार, डॉ. सिताराम रामचंद्र निकम यांना आदर्श प्राध्यापक पुरस्कार, प्रा. दीपक मोतीराम देवरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार, तर श्री. अण्णा संपत कदम यांना आदर्श प्रशासकीय कर्मचारी पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री. कैलास शंकर ठाकरे आणि श्री. सोपान पुंडलिक बिडगर यांनाही आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्काराने गौरविण्यात आले.


कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. हेमंत काळे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन प्रा. पंकज गांगुर्डे यांनी केले, तर उपप्राचार्य डॉ. एस. आर. निकम यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. आर. डी. पाटील, डॉ. सिताराम निकम, डॉ. रविराज वटणे, प्रा. दीपक देवरे, श्री. अण्णा कदम आणि श्री. सोपान बिडगर 

तसेच या सोहळ्यास महाविद्यालय विकास समिती व शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये श्री. विक्रम वावरे, श्री. विक्रांत वावरे, नगरसेविका श्रीमती छाया देवांग, श्रीमती प्रतिमा ताई पवार, नगरसेवक श्री. मुरलीधर भामरे, माजी नगरसेवक श्री. संजय भामरे, श्री. भरत केशव पाटील, श्री. वाळू नवले, माजी नगरसेविका डॉ. अश्विनी बोरस्ते, श्री. शंकरराव मटाले, श्रीमती सुनीता नेवरकर, श्रीमती मीनाक्षी वावरे, श्रीमती अंकिता वावरे, डॉ. प्रताप कोठावळे, श्री. साहेबराव थेटे, डॉ. मंगेश थेटे, श्री. देवराम सैंदाणे, श्री. श्याम पाटील, श्री. योगेश चव्हाण आणि श्री. अक्षय टिळे यांचा समावेश होता.

.

Post a Comment

0 Comments