क्रिकेट खेळायचं की हातगाड्यांना जागा द्यायची? नागरिकांचा संतप्त सवाल!
सिडको प्रतिनिधी :- ता :,१७ ऑगस्ट
सिडकोतील पवन नगर परिसरातील मैदान सध्या पाच ते सहा हातगाड्यांच्या विळख्यात सापडले आहे. नागरिकांसाठी, क्रिकेटप्रेमींसाठी, लहान मुलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या या मैदानातच हातगाड्या उभ्या करून जागा अडविण्यात आल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे
नाशिक महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग शहरातील अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाई करत असल्याचे यापूर्वीही दिसून आले आहे. त्यामुळे पवन नगर ग्राउंडमधील या हातगाड्यांकडे प्रशासनाचे लक्ष कधी जाणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
मैदान अतिक्रमणमुक्त करून नागरिकांना मोकळा श्वास घेता यावा, यासाठी महापालिका प्रशासन आणि अतिक्रमण विभाग आता कारवाईचा हातोडा चालवणार का? याकडे पवन नगर नगरवासीयांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment
0 Comments