बैठकीची वेळ ५.३०; आयुक्त आले ६.४५ ला! नगरसेवकांचा संताप
नाशिक (प्रतिनिधी):- नितीन चव्हाण
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला कुंभमेळा आयुक्त तब्बल सव्वा तास उशिराने उपस्थित झाल्याने नगरसेवकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. नगरसेवकांना सायंकाळी ५.३० वाजता बैठकीसाठी अधिकृत पत्राद्वारे बोलावण्यात आले होते. मात्र, आयुक्त ६.४५ वाजता बैठकीस उपस्थित झाल्याने लोकप्रतिनिधींना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली.
या प्रकारावर शिवसेनेचे महानगरप्रमुख तथा नगरसेवक प्रविण (बंटी) तिदमे यांनी नाराजी व्यक्त केली. नाशिककरांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना अशा पद्धतीने प्रतीक्षा करायला लावणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले.
‘हा केवळ प्रशासकीय विलंब नसून नगरसेवकांचा आणि पर्यायाने नाशिककरांचा अवमान आहे,’ अशी प्रतिक्रिया तिदमे यांनी दिली. सिंहस्थ कुंभमेळ्यासारख्या महत्त्वाच्या विषयाच्या नियोजनात प्रशासनाने लोकप्रतिनिधींच्या वेळेचा आणि भूमिकेचा आदर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकाराबाबत आपण उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचा इशाराही तिदमे यांनी दिला. कुंभमेळ्याच्या नियोजनात प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
-------------------------
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी नगरसेवकांना अधिकृत पत्र देऊन सायंकाळी ५.३० वाजता बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, कुंभमेळा आयुक्त तब्बल १ तास १५ मिनिटांनी, म्हणजे ६.४५ वाजता बैठकीला आले. नाशिककरांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना अशा प्रकारे प्रतीक्षा करायला लावणे हा केवळ प्रशासकीय विलंब नसून नगरसेवकांचा आणि पर्यायाने नाशिककरांचा अवमान आहे. हा प्रकार अत्यंत निषेधार्ह असून याबाबतआम्ही उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करणार आहोत.
प्रतिक्रिया...!
प्रविण (बंटी) तिदमे,
महानगरप्रमुख, शिवसेना,
नगरसेवक, नाशिक महापालिका

Post a Comment
0 Comments