Type Here to Get Search Results !

नाशिकच्या शिंदे गावात गुटख्यावर FDA चा छापा; १९.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिकच्या शिंदे गावात गुटख्यावर FDA चा छापा; १९.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त


 नाशिक (प्रतिनिधी) :-

नाशिकच्या शिंदे गावात प्रतिबंधित गुटखा विक्रीप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली. ११ ऑक्टोबर रोजी टाकलेल्या छाप्यात ११ लाख ३९ हजार ६०० रुपये किमतीचा गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे ८ लाख रुपये किमतीचे महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन, असा एकूण १९ लाख ३९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी राज इलियास सैय्यद याच्याविरुद्ध नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने ही कारवाई केली. आयुक्त तुकाराम मुंढे, सहआयुक्त मंगेश माने आणि सहाय्यक आयुक्त एस. एस. देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.


या प्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी प्रतिक भड, सुहास मंडलिक, श्रद्धा राहिंज आणि वैभव गर्दे यांच्या पथकाने ही कारवाई केली.


प्रतिबंधित गुटख्याची विक्री व वितरण करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.

Post a Comment

0 Comments