Type Here to Get Search Results !

मोबाईल हिसकावून नेणाऱ्या दोन आरोपीस 06 तासाचे आत अटक

 मोबाईल हिसकावून नेणाऱ्या दोन आरोपीस 06 तासाचे आत अटक

नाशिक रोड रेल्वे पोलीस स्टेशन ची कामगिरी 

नाशिक रोड (प्रतिनिधी):-

दिनांक 09/07/26 रोजी फिर्यादी नामें हे नाशिक रोड येथून मध्यप्रदेश येथे जाण्याकरिता प्लॅटफॉर्म येथे बसले असता दोन संशयित आरोपी यांनी त्याचे जवळ येऊन तु कुठे चालला आहे असे विचारून त्याला दमदाटी करून त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून पळून गेलेबाबतचा फिर्यादी यांनी तक्रार दिल्याने नाशिक रोड रेल्वे पोलीस स्टेशन गु रजि न.  175 /26 BNS 304(2) प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. 



सदर गुन्हा दाखल झाल्यावर ASI संतोष दत्तात्रेय उफाडे पाटील, HC शैलेश पाटिल RPF आरक्षक सागर संतोष वर्मा यांनी स्टेशन वरील CCTV फुटेज पाहून आरोपीचा स्टेशन परिसरात शोध घेऊन आरोपीस ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव ईश्वर रमेश इंगळे वय 35 वर्ष संजय विजय इंगळे वय 28 वर्ष दोघे रा मु निमकर्दा तालुका बाळापूर जी अकोला असे सांगून त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल करून त्यांनी 10,000/- रु किमतीचा मोबाईल काढून दिला. 


सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप पालवे सर, SDPO वसंत भोये, प्रभारी अधिकारी सचिन बनकर, RPF पोलीस निरीक्षक नवीन सिंग, PSI आत्माराम कामजळगे, सहाय्यक फौजदार संतोष दत्तात्रेय उफाडे, HC शैलेश पाटिल, HC सचिन दैवे, PC गणेश कांबळे, आरक्षक सागर वर्मा ,एम एस एफ गोकुळ राठोड यांनी केली.

Post a Comment

0 Comments