Type Here to Get Search Results !

"दोन दिवसांच्या पावसात रस्त्यांचा बोजवारा; सिडकोतील नव्याने झालेले रस्तेही उखडले, वाहनधारक संतप्त!"

 "दोन दिवसांच्या पावसात रस्त्यांचा बोजवारा; सिडकोतील नव्याने झालेले रस्तेही उखडले, वाहनधारक संतप्त!"

सिडको (प्रतिनिधी):-

 शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सिडको परिसरातील अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून काही दिवसांपूर्वीच करण्यात आलेल्या डांबरीकरणाचीही पोलखोल झाली आहे. नव्याने तयार झालेले रस्ते पावसाचा जोर सहन करू शकले नसल्याने निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.



रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून नागरिकांच्या खिशालाही आर्थिक फटका बसत आहे. विशेषतः कार्यालयीन वेळेत आणि शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.


स्थानिक नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे तातडीने खड्डे बुजविण्याची आणि निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या संबंधित ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पावसाळा नुकताच सुरू झाला असताना रस्त्यांची अशी अवस्था झाल्याने प्रशासनाच्या नियोजनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नागरिकांनी तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेण्याची मागणी केली आहे.


 

Post a Comment

0 Comments