ओझर नगरपरिषद उपनगराध्यक्षपदी रुपाली महाले यांची बिनविरोध निवड
ओझर (प्रतिनिधी) :-तुषार झोडगे
ओझर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या सभापती रुपाली महाले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सहा महिन्यांच्या आवर्तनानुसार तत्कालीन उपनगराध्यक्षा जान्हवी कदम यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर ही निवड प्रक्रिया पार पडली.
ओझर नगरपरिषदेच्या पहिल्या उपनगराध्यक्षा होण्याचा मान जान्हवी कदम यांना मिळाला होता. त्यांच्या कार्यकाळाची मुदत पूर्ण झाल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी रुपाली महाले यांची बिनविरोध निवड झाली.
उल्लेखनीय म्हणजे, सहा महिन्यांपूर्वी झालेल्या ओझर नगरपरिषदेच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्षपदासह १६ नगरसेवक निवडून आणत भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापन केली होती. या विजयामागे भाजपचे जिल्हाध्यक्ष यतिन कदम यांचे नेतृत्व महत्त्वाचे मानले जाते.
निवडीनंतर मुख्याधिकारी किरण देशमुख, नगराध्यक्ष अनिता घेगडमल, गटनेत्या जान्हवी कदम आणि भाजप जिल्हाध्यक्ष यतिन कदम यांच्या उपस्थितीत रुपाली महाले यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नगरसेविका पल्लवी देशमुख, योगिता कदम, कोमल थूल, नेहा जाधव, रोहिणी जाधव, रुपाली शेळके, रुपाली आढाव, ज्योती कुंदे तसेच नगरसेवक राकेश जाधव, अल्ताफ अत्तार, खंडेराव जोगारे, नीलेश चौरे, महेश शेजवळ, राजू भडके, राष्ट्रवादी गटनेते प्रमोद कुटे, उबाठाचे गटनेते सुनील कदम भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments