Type Here to Get Search Results !

सिन्नर फाटा परिसरात दरोड्याचा कट उधळला; तिघे संशयित जेरबंद

  सिन्नर फाटा परिसरात दरोड्याचा कट उधळला; तिघे संशयित जेरबंद

नाशिक रोड (प्रतिनिधी) :-

नाशिक रोड पोलिसांनी वेळीच कारवाई करत सिन्नर फाटा येथील सिटीलिंक बस डेपो परिसरात दरोड्याचा कट उधळून लावला आहे. डायल 112 वर आलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघा संशयितांना ताब्यात घेतले.



नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीतील सिटीलिंक बस डेपो, सिन्नर फाटा परिसरात चार ते पाच संशयित इसम लपून बसल्याची माहिती डायल 112 वरून पोलिसांना मिळाली. त्यानंतर सीआर मोबाईल व डीबी पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांची चाहूल लागताच संशयित झाडाझुडपांच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र पाठलाग करून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे साहेबराव गोविंद डोंगरे, रामदास देविदास सूर्यवंशी आणि गणेश भिकाजी खेडकर अशी आहेत. त्यांच्या अंगझडतीत दोरी, मिरचीची पूड, लोखंडी करवत आणि लोखंडी कटर अशी दरोड्यासाठी वापरली जाणारी साधने जप्त करण्यात आली.

प्राथमिक चौकशीत हे संशयित चोरी अथवा दरोडा टाकण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी जमल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला 

 

Post a Comment

0 Comments