इम्पॅक्ट | पंचनामा न्यूजचा दणका!
बातमीचा इम्पॅक्ट; अश्विननगरातील उघड्या विद्युत डीप्यांना काही तासांतच बसले झाकण
नाशिक | प्रतिनिधी (१२जुलै)
सिडकोतील अश्विननगर परिसरातील उघड्या विद्युत डीप्यांमुळे नागरिकांच्या जीविताला निर्माण झालेल्या धोक्याबाबत **'पंचनामा न्यूज'**ने वृत्त प्रसिद्ध करताच महावितरण प्रशासन खडबडून जागे झाले. बातमीची तातडीने दखल घेत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत उघड्या डीप्यांची पाहणी केली आणि काही तासांतच सर्व धोकादायक डीप्यांना सुरक्षित झाकण बसविले.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शॉर्टसर्किट अथवा अन्य दुर्घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन करण्यात आलेल्या या त्वरित कारवाईमुळे संभाव्य अनर्थ टळला. प्रशासनाच्या या जलद प्रतिसादामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत पंचनामा न्यूजचे आभार मानले.
लोकहिताचा प्रश्न उचलला... प्रशासनाने तात्काळ कारवाई केली... आणि संभाव्य अनर्थ टळला!

Post a Comment
0 Comments