Type Here to Get Search Results !

'ऑपरेशन मंडलेश्वर' यशस्वी; खुनाचा फरार आरोपी अखेर गजाआड

राज्य बदललं, ठिकाण बदललं... पण पोलिसांच्या तपासातून सुटका नाही!


नाशिक (प्रतिनिधी):-

 तब्बल दोन वर्षांपासून खुनाच्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला नाशिक शहर गुन्हेशाखा युनिट-२च्या पथकाने मध्यप्रदेशातील मंडलेश्वर येथून जेरबंद करत दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा केला आहे. अत्यंत गुप्त आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आलेल्या या कारवाईमुळे पोलिसांच्या तपासाला मोठे यश मिळाले आहे.



७ डिसेंबर २०२३ रोजी लहवित परिसरातील रेल्वे मार्गाजवळ फिर्यादीचे वडील नातेवाईकांसोबत काम करत होते. दुपारच्या सुमारास काम आटोपून ते पाणी पीत असताना गुलाबसिंग मांगीलाल आखाडे याने कोणतेही कारण नसताना हातातील लोखंडी पहारीने त्यांच्यावर सपासप वार केले. डोक्यावर आणि पाठीवर गंभीर मार लागल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.


घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी तपास केला. साक्षीदारांची चौकशी, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यात विविध ठिकाणी लपून राहत असल्याचे समोर आले.


वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हेशाखा युनिट-२चे पथक मध्यप्रदेशात रवाना झाले. सलग दोन दिवस तेथे थांबून आरोपीचा शोध घेण्यात आला. अखेर गुप्त माहितीच्या आधारे मंडलेश्वर परिसरातील चोली गावात सापळा रचून आरोपी गुलाबसिंग मांगीलाल आखाडे याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला नाशिक येथे आणून पुढील कारवाईसाठी देवळाली कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नी हेमंत तोडकर, डॉ. समाधान हिरे, मुक्तारखान पठाण, गुलाब सोनार, प्रदीप नन्नवरे, संतोष सुपेकर आणि जितेंद्र वजीरे यांनी यशस्वीपणे पार पाडली. या धडाकेबाज कारवाईमुळे दोन वर्षांपासून कायद्याच्या कचाट्यातून दूर राहिलेल्या आरोपीला अखेर बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे.


असा रचला सापळा... अन् दोन वर्षांनंतर आरोपीला ठोकल्या बेड्या!"

खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी गुलाबसिंग मांगीलाल आखाडे तब्बल दोन वर्षांपासून फरार होता. त्याचा कोणताही ठावठिकाणा लागत नसल्याने गुन्हेशाखा युनिट-२ने नव्याने तपासाची सूत्रे हाती घेतली. घटनास्थळी काम करणारे साक्षीदार, नातेवाईक आणि संबंधित व्यक्तींकडे पुन्हा सखोल चौकशी करण्यात आली. त्यानंतर तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि स्थानिक नेटवर्कच्या आधारे आरोपी मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

वरिष्ठांच्या परवानगीनंतर स. पो. नी हेमंत तोडकर, डॉ. समाधान हिरे, मुक्तारखान पठाण, गुलाब सोनार, प्रदीप नन्नवरे, संतोष सुपेकर आणि जितेंद्र वजीरे यांचे विशेष पथक मध्यप्रदेशात रवाना झाले. पथकाने सलग दोन दिवस स्थानिक पातळीवर गुप्त हालचाली करत आरोपीच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवली.

अखेर गुप्त माहितीच्या आधारे मंडलेश्वर परिसरातील चोली गावात सापळा रचण्यात आला. आरोपी तेथे येताच पोलिसांनी त्याला कोणतीही संधी न देता ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला नाशिक येथे आणून पुढील कारवाईसाठी देवळाली कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दोन वर्षांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या आरोपीला जेरबंद करण्यात गुन्हेशाखा युनिट-२ला अखेर मोठे यश मिळाले.

Post a Comment

0 Comments