अन्न सुरक्षा विभागाची धडक कारवाई.
परवाना व नोंदणी नसलेल्या खाद्य आस्थापनांवर ₹3 लाखांचा दंड
नाशिक (प्रतिनिधी) :-
नाशिक जिल्ह्यात अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 अंतर्गत परवाना व नोंदणी न घेता खाद्य व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत धडक कारवाई करण्यात आली.
तुकाराम मुंढे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, मंगेश माने, सहआयुक्त (अन्न) तसेच संदिप देवरे, सहाय्यक आयुक्त, परिमंडळ-4, यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.देवळाली येथील खाऊ गल्ली व बस स्टँड परिसरातील स्ट्रीट फूड आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यावेळी 15 खाद्य व्यवसायिकांकडे आवश्यक FSSAI परवाना/नोंदणी नसल्याचे आढळून आले संबंधित आस्थापनांविरुद्ध नियमानुसार कारवाई करून एकूण ₹2,20,000/- दंड वसूल करण्यात आला. तसेच दोन आस्थापनांमध्ये खाद्यपदार्थ देण्यासाठी न्यूज पेपर देत असताना आढळले, संबंधित आस्थापनांवर प्रत्येकी 15,000/- दंड आकारण्यात आला आहे.
तसेच दिंडोरी व सटाणा परिसरात तपासणीदरम्यान 3 खाद्य व्यवसायिकांकडे आवश्यक FSSAI परवाना/नोंदणी नसल्याचे आढळून आले. संबंधितांवर नियमानुसार कारवाई करून एकूण ₹90,000/- दंड आकारण्यात आला.
अशाप्रकारे करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये एकूण ₹3,10,000/- (रुपये तीन लाख) दंड वसूल करण्यात आला.
सदर कारवाईसाठी माहिती संकलन व प्रत्यक्ष कारवाई प्रतीक भड, अन्न सुरक्षा अधिकारी, परिमंडळ-4; चेतन परदेशी, अन्न सुरक्षा अधिकारी, परिमंडळ-4 आणि सोनल पाडळे, अन्न सुरक्षा अधिकारी, परिमंडळ-4 यांनी केली.
अन्न व्यवसाय करणाऱ्या सर्व व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 नुसार आवश्यक FSSAI परवाना किंवा नोंदणी घेऊनच व्यवसाय करावा, तसेच अन्न व्यवसायासंदर्भातील स्वच्छता व सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत करण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments