Type Here to Get Search Results !

नाशिक शहरासह जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे धक्के

नाशिक शहरासह जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे धक्के

नाशिक (प्रतिनिधी) :-

 नाशिक शहराच्या अवतीभवती भूकंप सदृश्य धक्के जाणवण्याच्या घटना यापूर्वी घडल्या असताना शनिवारी (दि. ८) रात्री म्हसरूळ-आडगाव जत्रा हॉटेल परिसरात, नवीन नाशिक परिसरात भूकंपसदृश धक्के जाणवल्याची माहिती नागरिकांनी दिल्याने एकच खळबळ उडाली. रात्री सुमारे १० वाजून ३ मिनिटांच्या सुमारास अचानक जमीन हादरल्यासारखी व कंपन जाणवल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.



म्हसरूळ, आडगाव तसेच जत्रा हॉटेल परिसरातील काही नागरिकांना घरातील वस्तू व दरवाजे हलल्यासारखे जाणवले. काहींनी अचानक आलेल्या कंपनामुळे घराबाहेर येत परिसरात पाहणी केली. पंचवटी परिसरातही अशाच प्रकारचे धक्के जाणवले असल्याचा दावा काही नागरिकांनी केला आहे.


नाशिक शहराच्या परिसरात यापूर्वीही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शनिवारी रात्री जाणवलेल्या या कंपनांमुळे नागरिकांमध्ये अधिकच चिंता निर्माण झाली. नेमके हे धक्के भूकंपाचे होते की अन्य कोणत्या कारणामुळे कंपन निर्माण झाले, याबाबत अधिकृत माहिती जिल्हा प्रशासनाकडून अद्याप मिळाली झालेली नाही.


दरम्यान, या घटनेची अधिकृत भूकंपमापन यंत्रणेकडून नोंद झाली आहे का, तसेच धक्क्यांची तीव्रता किती होती, याबाबत प्रशासनाकडून माहिती घेण्याचे काम सुरू आहे. अधिकृत अहवालानंतरच या घटनेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.


धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीती

रात्रीच्या वेळी अचानक जाणवलेल्या कंपनामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.


दिंडोरी तालुक्यातील दिंडोरी महाजे तळेगाव गोळशी ननाशी गोळशी आदी परिसर भूकंप आणि आधारला दहा वाजून एक मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले. अचानक घर हादरल्याने ग्रामस्थ सुद्धा भयभीत झाले. अनेक लोक घराबाहेर पळाले. आदिवासी भागातील गवळा पाडा महाजे वारे परिसरात भूकंपाचे जास्त तीव्रता वाढली. त्यामुळे लोकांनी एकमेकाला मोबाईल वरून माहिती घेऊन सावध केले. दिंडोरी शहरातील परिसरात धामण नदी तिरा लगत भूकंपाचा धक्का बसल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते हेमंत बोरसे यांनी दिली वारे परिसरात भूकंप हादरा जोरात जाणवल्याचे माजी आमदार धनराज महाले यांनी सांगितले. गवळीवाडा येथे लोक घराबाहेर राहण्याची माहिती गणेश गवळी यांनी दिली विठ्ठल नगर येथे घराचे झाड थरथरल्याचे नरेश चव्हाण यांनी सांगितले दिंडोरी परिसरात यंदाचा हादरा सर्वांनाच जाणवला. दिंडोरी तालुक्यात वारंवार भूकंपाचे धक्के बसू लागल्याने शासनाने गाफील न राहता तातडीने उपाययोजना करावी लोकांना सावध करावे भूकंपमापक यंत्रणा बसवावी अशी मागणी धनराज महाले यांनी केली आहे.


जिल्हा प्रशासानाचे नागरिकांना आवाहन


🚨नाशिक जिल्ह्यात व तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवाहन 🚨


 या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी सतर्क राहावे व सुरक्षिततेची काळजी घ्यावी.


🏠 घरात असल्यास खिडक्या, काचा, कपाटे व जड वस्तूंपासून दूर राहावे. शक्य असल्यास मजबूत टेबलाखाली आसरा घ्यावा.


🚫 भूकंपाचे धक्के सुरू असताना लिफ्टचा वापर करू नये व धावत बाहेर पडण्याचा प्रयत्न करू नये.


🌳 धक्के थांबल्यानंतर इमारतीपासून सुरक्षित अंतरावर मोकळ्या जागेत जावे. विजेच्या तारा, झाडे व धोकादायक बांधकामांपासून दूर राहावे.


📱 अफवा किंवा अप्रमाणित माहिती पसरवू नये. प्रशासनाकडून मिळणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे.


👨‍👩‍👧‍👦 विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींची काळजी घ्यावी.


सतर्क राहा • सुरक्षित राहा • अफवांवर विश्वास ठेवू नका


🙏 सर्व नागरिकांनी शांतता राखून एकमेकांना सहकार्य करावे.

Tags

Post a Comment

0 Comments