Type Here to Get Search Results !

जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिनाचा दिमाख; आयुष प्रसाद यांच्या हस्ते ध्वजारोहण

 जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिनाचा दिमाख; आयुष प्रसाद यांच्या हस्ते ध्वजारोहण.

नाशिक प्रतिनिधी :-ता:, १५ऑगस्ट 


भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिनाचा सोहळा उत्साहात पार पडला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्यदिनाचा उत्साह साजरा केला.



या कार्यक्रमाला जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कर्मचारी तसेच निवृत्त लष्करी व नौदल अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताच्या निनादात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात संपूर्ण परिसर भारावून गेला.


स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व अधोरेखित करत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात जबाबदारीने योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी केले.


स्वातंत्र्यसैनिक, जवान आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना अभिवादन करत उपस्थितांनी राष्ट्रीय एकात्मता, देशभक्ती आणि लोकसेवेची भावना अधिक दृढ करण्याचा संकल्प केला. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमुळे यंदाचा स्वातंत्र्यदिन सोहळा विशेष उत्साहात पार पडला.

Tags

Post a Comment

0 Comments