Type Here to Get Search Results !

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात महिलेचा राडा; पोलिसांवर गंभीर आरोप

 स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात महिलेचा राडा; पोलिसांवर गंभीर आरोप

नाशिक प्रतिनिधी :-ता:, १५ ऑगस्ट 


 नाशिकमध्ये स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम सुरू असतानाच विभागीय कार्यालयाबाहेर एका महिलेने जोरदार गोंधळ घातल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. राज्याचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन विभागीय कार्यालयात दाखल असतानाच हा प्रकार घडल्याने पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.

महिलेने उपनगर पोलिसांवर पैसे घेतल्याचा गंभीर आरोप करत संताप व्यक्त केला. तसेच, “माझ्या मुलाला मारणाऱ्यांना मी सोडणार नाही,” असा इशाराही तिने दिला. महिलेचा आक्रमक पवित्रा पाहता परिस्थिती चिघळू नये यासाठी पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केला.



पोलिसांनी महिलेला ताब्यात घेत उपनगर पोलीस ठाण्यात नेले. या प्रकारामुळे स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमादरम्यान विभागीय कार्यालयाबाहेर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. महिलेने केलेल्या आरोपांबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती समोर आलेली नसून, या प्रकरणाची पुढील चौकशी करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments