Type Here to Get Search Results !

पराभव पचवता आला पाहिजे! प्रभाग ३० मध्ये सागर देशमुख यांच्या कामाची चर्चा; स्वीकृत नगरसेवक करण्याची मागणी

 पराभव पचवता आला पाहिजे! प्रभाग ३० मध्ये सागर देशमुख यांच्या कामाची चर्चा; स्वीकृत नगरसेवक करण्याची मागणी


नाशिक प्रतिनिधी : - नितिन चव्हाण ता :, २८ सप्टेंबर


महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३० मधून अत्यंत थोड्या मतांनी पराभूत झालेले सागर देशमुख यांनी निकालानंतरही न खचता सुरू ठेवलेल्या जनसेवेची परिसरात चर्चा रंगली आहे.

महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या तिसऱ्याच दिवसापासून देशमुख आणि पूजा देशमुख यांनी निवडणुकीपूर्वी ज्या जोमाने सामाजिक उपक्रम राबवले, त्याच उत्साहाने पुन्हा जनसेवेची कामे सुरू केली. गणपती विसर्जनादरम्यान नागरिकांमध्ये झालेल्या चर्चेत ज्येष्ठ नागरिकांनी, “पराभव पचवता आला पाहिजे, हे सागर देशमुख यांच्याकडून शिकावे,” अशा शब्दांत त्यांच्या कार्याचे कौतुक केल्याचे सांगण्यात आले.


परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी निवडणूक संपल्यानंतरही देशमुख सक्रिय असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कार्यकर्ता म्हणून नव्हे, तर सेवक म्हणून काम करण्याची त्यांची भूमिका ज्येष्ठ नागरिकांसह तरुणांमध्येही चर्चेचा विषय ठरत आहे.


दरम्यान, अल्प मतांनी पराभूत झालेले आणि सातत्याने सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या सागर देशमुख यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणी प्रभागातील काही नागरिकांकडून होत असल्याचे चित्र आहे.


यंदाच्या गणेशोत्सव तसेच आनंद मेळाव्यात देशमुख यांनी राबवलेल्या उपक्रमांचीही परिसरात चर्चा झाली. विविध राजकीय नेते आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या उपक्रमांची पाहणी केल्याचे सांगण्यात आले.

याबाबत सागर देशमुख म्हणाले, “मला मनापासून समाजसेवा करायला आवडते. नागरिकांना दिलेला शब्द पाळण्याचा मी प्रयत्न करत आहे. नागरिकांसाठी काम करण्यातच मला मनस्वी आनंद मिळतो.”

Post a Comment

0 Comments