Type Here to Get Search Results !

स्पीड ब्रेकर काढले, आता डांबरी स्पीड ब्रेकरचे आश्वासन; आणखी एका बळीची वाट पाहणार का?

 खुटवड नगर, सिटू भवन चौफुलीवर नागरिकांचा सवाल; अशोक पवार यांचा प्रशासनावर निशाणा


सिडको प्रतिनिधी :,नितिन चव्हाण 


खुटवड नगर, सिटी भवन येथील चौफुलीवर काही दिवसांपूर्वी भरधाव डम्परच्या धडकेत एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन करून परिसरातील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला होता.

त्यानंतर आमदार सीमा महेश हिरे यांनी वाहतूक पोलीस प्रशासनाशी पत्रव्यवहार करून चौफुलीवर स्पीड ब्रेकर बसविण्याबाबत पाठपुरावा केला होता. मात्र, काही महिन्यांनंतर महापालिका प्रशासनाकडून हे स्पीड ब्रेकर काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.


सध्या प्रशासनाकडून डांबरी स्पीड ब्रेकर बसविण्याचे आश्वासन दिले जात आहे. मात्र, प्रत्यक्ष काम होण्यापूर्वी पुन्हा एखादा निष्पाप जीव गमवावा लागणार का, असा सवाल भाजपचे सरचिटणीस अशोक पवार यांनी उपस्थित केला आहे.


"अपघात घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा संभाव्य अपघात टाळण्यासाठी तातडीने स्पीड ब्रेकर बसविणे गरजेचे आहे," अशी भूमिका अशोक पवार यांनी मांडली.

Post a Comment

0 Comments