जुने सिडकोतील मनपा शाळेत सेमी इंग्लिश शाळेचा प्रस्ताव द्या
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या प्रशासनाला सूचना
नवीन नाशिक :प्रतिनिधी
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना. दादाजी भुसे साहेब यांनी प्रभाग क्रमांक २४ मधील जुने सिडकोतील अचानक चौक येथील नाशिक महापालिकेच्या बंद पडलेल्या शाळा इमारतीला भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. या इमारतीत सेमी इंग्लिश शाळा सुरु करण्यासाठी तातडीने प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना ना. दादाजी भुसे साहेब यांनी मनपा शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या. शिवसेना नगरसेवक तथा शिवसेना महानगर प्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांनी सेमी इंग्लिश शाळा सुरु करण्याची मागणी ना. दादाजी भुसे साहेब यांच्याकडे केली होती.
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना. दादाजी भुसे साहेब यांनी रविवारी जुने सिडकोतील मनपा माध्यमिक शाळेला भेट देऊन बंद असलेल्या शाळेची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शाळेची सद्यस्थिती, उपलब्ध जागा तसेच परिसरातील विविध बाबींची पाहणी करून स्थानिक नगरसेवक आणि प्रशासनाकडून माहिती घेण्यात आली. स्थानिक नगरसेवक प्रविण (बंटी) तिदमे यांनी या शाळेच्या इमारतीत सेमी इंग्लिश शाळा सुरु करण्याची विनंती ना. दादाजी भुसे यांच्याकडे केली. ना. दादाजी भुसे साहेबांनी तात्काळ मनपा शिक्षणाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
यावेळी महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे, शिवसेना गटनेते अजय बोरस्ते, महानगरप्रमुख प्रविण (बंटी) तिदमे, नगरसेविका पल्लवी गणोरे, पूनम महाले, माजी नगरसेविका मंदाकिनी जाधव, अमोल नाईक यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि प्रभागातील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments